sandeep Shirguppe
उन्हाळ्यात आराम वाटण्यासाठी सब्जा बियांचा वापर करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.
तुळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे आवश्यक पोषक घटक असतात.
उन्हाळ्यात शरिरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी सब्जा बिया महत्वाचे आहे.
तुळशीच्या बियांमध्ये म्यूसिलेज असते याने आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते.
रक्तप्रवाहात साखरेचे उत्सर्जन कमी करण्यास सब्जा बियांची मदत होते.
तुळशीच्या बियांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करतात.
तुळशीच्या बियांमध्ये आढळणारे पोषक तत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
तुळशीच्या बियांच्या पाण्याचा शरीरावर थंडावा असतो, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.