sandeep Shirguppe
चवीला गोड अन् रसदार असलेले स्टार फळ अनेक पोषक तत्वांनी भरलेलं असतं.
स्टार फळात फायबरचे प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीज कमी असतात.
व्हिटॅमिन्स, मिनरल्स, एंटीऑक्सीडंटचे जास्त प्रमाण स्टार फळात आहे.
फायबर, बद्धकोष्ठतेसह चांगल्या जीवाणूंच्या वाढीस स्टार फळ प्रोत्साहन देऊन पचनसंस्था सुधारते.
स्टार फ्रूट खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल-कमी होते, आपल्या शरीरातून फॅट मॉलिक्यूल काढून टाकते.
स्टार फ्रुटमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि इतर मिनरल्सही भरपूर असतात, ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.
तुम्ही याचा वापर करून हेल्दी स्मूदी बनवू शकता, उन्हाळ्यात या फळापासून बनवलेला सरबत अतिशय थंड असतो.
स्टार फ्रूटचा आनंद घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पूर्णपणे धुवून, त्याचे तुकडे करून ताजे खाणे.