Lemon Grass : विविध उद्योगात गवती चहाचे उपयोग

Team Agrowon

गवती चहा ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. भारतामध्ये केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यात याची मोठी लागवड आहे.

Lemon Grass | Agrowon

गवती चहाला एक विशिष्ट सुगंध असतो. रोजच्या चहामध्ये गवती चहाची पाने वापरतात. तसेच औषधे निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो.

Lemon Grass | Agrowon

गवती चहामध्ये फेनॉल्स आणि फ्लेवोनॉइड्स ही फायटोकेमिकल्स असतात. केरळमध्ये गवती चहाच्या पानापासून तेल काढण्याचा उद्योग विकसित झाला आहे.

Lemon Grass | Agrowon

तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून कागद निर्मिती करता येते.

Lemon Grass | Agrowon

गवती चहाची पावडर जनावरांच्या खाद्यात वापरल्यास जनावारांची रवंथ करण्याची क्षमता वाढते.

Lemon Grass | Agrowon

सूप, सॉस, वाईन, शीतपेये, मिठाई तसेच मासे इत्यादी अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी गवती चहा वापरतात.

Lemon Grass | Agrowon

गवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत आणि सौंदय प्रसाधने निर्मितीमध्ये वापरतात.

Lemon Grass | Agrowon

साठवण्याच्या धान्यांमध्ये कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.

Lemon Grass | Agrowon