Bee Species : भारातातील पालनासाठी उपयुक्त मधमाशांच्या प्रजाती

Mahesh Gaikwad

मध उत्पादन

मधमाशा मध उत्पादनासोबतच पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Bee Species | Agrowon

परागीभवन

मधमाशीमुळे पिकांचे उत्तम परागीभवन होते. त्यामुळे चांगले आणि अधिक उत्पादन मिळते.

Bee Species | Agrowon

मधमाशी प्रजाती

भारतामध्ये एकूण चार प्रकारच्या मधमाशा आढळून येतात. त्यापैकी सातपुडी मधमाशी ही पालनाच्या दृष्टीने उपयुक्त आणि योग्य असल्याचे आढळून आले आहे.

Bee Species | Agrowon

सातपुडी मधमाशी

या माशा आकाराने आग्या माशांपेक्षा लहान आणि झुडपी माशांपेक्षा मोठ्या असतात. या माशा स्वभावाने खूप शांत असतात.

Bee Species | Agrowon

आग्या मधमाशी

या माशा आकाराने सर्वात मोठ्या असून स्थलांतर करणाऱ्या आहे. त्यामुळे त्यांना पाळता येत नाही. या माशा स्वभावाने जास्त चिडक्या, रागीट आणि क्रूर असतात.

Bee Species | Agrowon

युरोपीयन मधमाशी

ही माशी युरोप आणि इटलीमध्ये आढळून येते. या माशांना सहजपणे पाळणे शक्य आहे. या माशा दगडांच्या कपारीत, झाडांच्या ढोलीत पोळी बांधतात.

Bee Species | Agrowon

डॅमर मधमाशी

या मधमाशा आकाराने इतर मधमाशांपेक्षा फारच लहान म्हणजे डासांच्या आकाराच्या असतात. झाडांच्या किंवा भींतींच्या पोकळीत द्राक्षाच्या घडासारखे पोळे बांधतात.

Bee Species | Agrowon

झुडपी मधमाशी

या माशीला छोटी माशी असे म्हणतात. या माशीचा आकार १० बाय २० सेंमी आकारचे एकच पोळे बांधतात. हे पोळे झाडाच्या फांदीला, झुडपामध्ये कुंवा इमारतींच्या भींतीला आढळतात.

Bee Species | Agrowon