Turmeric : शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर

Aslam Abdul Shanedivan

मिठाई, चटपटीत आणि तेलकट पदार्थ

मिठाई, चटपटीत आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होऊ शकतात

Turmeric | Agrowon

विषारी पदार्थ

यामुळे पोट, लिव्हर, आतड्या आणि किडन्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होतात. जे शरीराला हानी पोचवतात

Turmeric | Agrowon

हळद

शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे पदार्थ बाहेर पडणे गरजेचे असते. त्यासाठी आपण घरात मिळणाऱ्या हळदीचा वापर करू शकता

Turmeric | Agrowon

अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुण

तज्ज्ञांच्यानुसार हळद आपल्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करते

Turmeric | Agrowon

हळदीचं दूध

हळदीचं दूध केवळ शरीराला पोषक तत्व देत नाही. तर शरीर डिटॉक्सीफाय करते. दूध हळद आणि काळ्या मिऱ्यांची थोडी पावडर शरीरात उर्जा आणते

Turmeric | Agrowon

डिटॉक्स वॉटर

शरीर डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स वॉटर चांगला मार्ग आहे. यासाठी हळदीसोबत आल्याचा वापर करा. याने पोट फुगणं, सूज, घशातील खवखव, फ्लू आणि अ‍ॅलर्जीसारख्या समस्या दूर होतात.

Turmeric | Agrowon

हळदीचा चहा

हळदीच्या चहात हळद, अर्धा चमचा बारीक आलं, १ चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, २ कप गरम पाणी घ्या. ते उकळून घेतल्यानंतर थंड करून यात लिंबाचा रस, मध मिक्स करून प्या.

Turmeric | Agrowon

Beetroot : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सॅलडमध्ये करा बीटरूटचा वापर