Aslam Abdul Shanedivan
वातावरणातील आद्रतेमुळे घरातील फर्निचर, बिछान्यात ढेकूणांची निर्मिती होते. जे प्रयत्न करूनही लवकर कमी होत नाहीत.
यामुळे रात्री बेडवर झोपणाऱ्याला ढेकूण चावल्याने रात्रभर झोप लागत नाही. यामुळे ढेकणांपासून सुटका करून घेण्यासाठी पुढील टीप्स् वापरता येतील
बेड किंवा फर्निचरमध्ये ढेकूण झाले असतील तर लसणाचे बारीक तुकडे करून पाण्यात मिसळा आणि ते फवारा. लसणाच्या उग्र वासाने ढेकूण पळून जातील.
कडुलिंबामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे ढेकूण कमी होतात.
बेकिंग सोडा देखील ढेकूण रोधक असून पाणी आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण ढेकूण कमी करते.
सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे कडक उन... आपले अंथरून कडक उन्हात ठेवल्यास ढेकूणही होत नाहीत
लव्हेंडर तेलाचा वापर लहान कीटकांना दूर करण्यासाठी केला जातो. ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही देखील याचा उपयोग करू शकता.