Swarali Pawar
पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी हे खत खूप उपयुक्त आहे. पिकाला पोषण देऊन शाकीय वाढ जोमदार करते.
फुले येण्याआधी किंवा नंतर वापरले जाते. फळांचा आकार, रंग आणि वाढ सुधारण्यासाठी हे खत मदत करते.
नवीन मुळे आणि पिकाची वाढ चांगली करण्यासाठी उपयुक्त. फुलांची योग्य वाढ व फुटवा सुधारते.
याच्या फवारणीमुळे कपाशी व शेंगवर्गीय पिकांमध्ये फुलगळ थांबवते. शेंगांची संख्या आणि उत्पादन वाढवते.
या खतामध्ये पालाश जास्त आणि नत्र कमी असते. हे फुलोऱ्यानंतर व पक्व अवस्थेत उपयुक्त आहे. पाण्याचा ताण असताना पिकाची प्रतिकारक क्षमता वाढवते आणि अन्ननिर्मिती सुधारते.
या खताच्या फवारणीमुळे पिकाची कायिक वाढ थांबून फुलकळी व फळधारणा वाढते.
या खताच्या फवारणीमुळे नत्र अमोनिकल आणि नायट्रेट स्वरूपात मिळते. हे खत पिकाच्या सुरुवातीच्या वाढीपासून फुलधारणा अवस्थेपर्यंत वापरता येते.
हे खत पिकाला अवर्षणात तग धरण्यास मदत करते. फळांचा आकार, रंग, वजन आणि गुणवत्ता सुधारते. यात गंधक असल्याने भुरीसारख्या रोगांवरही नियंत्रण मिळते.
कॅल्शिअम नायट्रेटच्या फवारणीमुळे मुळांची जोमदार वाढ करते आणि पिकाला काटक बनवते. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी तसेच शेंगा व फळ वाढीच्या टप्प्यात उपयुक्त आहे.