Monsoon Maize Protection: पावसानंतर मका पिकावरील कीड-रोगांवर नियंत्रण कसे करावे?

Swarali Pawar

व्यवस्थापनाची गरज

मागील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने मक्यावरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना करून मका पिकाचे रक्षण करणे गरजेचे आहे.

Need For Management | Agrowon

लष्करी अळी

पाने कुरतडून छिद्रे तयार होतात व वाढ खुंटते. अंडी व अळ्या वेचून नष्ट करा, निंबोळी अर्क फवारणी व ट्रायकोग्रामा परोपजीवी सोडावे.

Fall Armyworm | Agrowon

कणसे पोखरणारी अळी

ही अळी कणसाला पोखरून आतील दाणे खाते व उत्पादन घटते. झाडांचे अवशेष नष्ट करा, अळ्या हाताने काढून टाका व एचएएनपीव्ही किंवा ट्रायकोग्रामा कार्ड वापरावेत.

Helicoverpa Armigera | Agrowon

करपा रोग

या रोगामुळे पानांवर लांब करड्या-हिरव्या चिरा, तपकिरी डाग दिसतात. मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझीम मिश्रणाने ८-१० दिवसांच्या अंतराने फवारणी करा.

Bacterial Blight in Maize | Agrowon

फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या रोग

या रोगामुळे खोड तपकिरी व मऊ होतो, झाड कोलमडते व सहज शेंड्यापासून वेगळे होते. याच्या नियंत्रणासाठी उत्तम निचरा ठेवा व मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब फवारणी करावी.

Pre Flowering Stem Rot | Agrowon

फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोग

यामध्ये खोड कापल्यावर आतील भाग गुलाबी-जांभळा दिसतो व झाड वाळते. ट्रायकोडर्मा + शेणखत सरीवरंब्यावर टाका व योग्य पाणी व्यवस्थापन ठेवावे.

Post Flowering Stem Rot | Agrowon

शेतकऱ्यांसाठी सूचना

मका पिकातील रोग व किडींचे लक्षणे लवकर ओळखणे महत्त्वाचे आहे. जैविक, यांत्रिक आणि रासायनिक उपायांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.

Advisary for Farmers | Agrowon

तज्ज्ञांचा सल्ला

योग्य वेळी रोग व किड नियंत्रण केल्यास उत्पादन घट टाळता येते. शेतकऱ्यांनी नियमित निरीक्षण व एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे.

Maize Production | Agrowon

Soybean Crop Protection: पावसानंतर सोयाबीन पिकावर रोग-किडींचा धोका! जाणून घ्या नियंत्रणाचे उपाय

अधिक माहितीसाठी...