Summer Bajara Cultivation: योग्य तंत्र वापरा, उन्हाळी बाजरीतून भरघोस उत्पादन घ्या!

Swarali Pawar

उन्हाळी बाजरीचे फायदे

बाजरी कमी कालावधीत तयार होते आणि ५–६ पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात. कीड-रोग कमी येतात आणि जनावरांसाठी चांगला चारा मिळतो.

Benefits of Bajara Farming | Agrowon

जमीन निवड व पूर्वमशागत

मध्यम ते भारी व निचरा होणारी जमीन बाजरीसाठी योग्य असते. नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात व शेणखत मिसळावे.

Soil Preparation | Agrowon

पेरणीची योग्य वेळ

१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा पेरणीसाठी उत्तम काळ आहे. उशीर केल्यास उष्णतेचा परिणाम होऊन उत्पादन कमी होते.

Sowing Time | Agrowon

पेरणीची पद्धत

३–४ किलो बियाणे प्रति हेक्टर पुरेसे असते. ४५ × १५ सें.मी. अंतरावर व ३–४ सें.मी. खोलीवर पेरणी करावी.

Bajara Sowing | Agrowon

योग्य वाणांची निवड

संकरीत वाण: आदिशक्ती, फुले महाशक्ती, JHB-558. सुधारित वाण: धनशक्ती, ICMV-221 आणि खाजगी वाण वापरता येतात.

Variety Selection | Agrowon

बीजप्रक्रिया

मीठाच्या द्रावणाने बीजप्रक्रिया करून खराब बियाणे वेगळे काढावे. मेटॅलॅक्झील व जिवाणू खताची प्रक्रिया केल्यास रोग कमी येतात.

Seed Treatment | Agrowon

जिवाणू संवर्धनाचे फायदे

अझोटोबॅक्टर व PSB २५ ग्रॅम प्रति किलो वापरल्यास नत्राची बचत होते. यामुळे उत्पादन सुमारे १० टक्क्यांनी वाढते.

Bio fertilizers | Agrowon

खत व्यवस्थापन

माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. झिंक कमी असल्यास झिंक सल्फेट वापरून उत्पादन वाढवावे.

Chemical Fertilizers | Agrowon

Sunflower Farming: उन्हाळी सूर्यफुलाचे उत्पादन वाढवण्यासाठी लागवड तंत्र

Agrowon
अधिक माहितीसाठी...