Sunflower Farming: उन्हाळी सूर्यफुलाचे उत्पादन वाढवण्यासाठी लागवड तंत्र

Swarali Pawar

जमीन कशी निवडावी?

मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा. पाणथळ व आम्लयुक्त जमीन टाळा.

Soil | Agrowon

पेरणीची योग्य वेळ

फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करा. उशीर झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो.

Sowing Time | Agrowon

पेरणीचे अंतर

मध्यम जमिनीत 45 × 30 से.मी. अंतर ठेवा. भारी जमिनीत व संकरीत वाणासाठी 60 × 30 से.मी. अंतर ठेवा.

Crop Spacing | Agrowon

बियाण्याचे प्रमाण

सुधारित वाणासाठी 8–10 किलो/हेक्टर वापरा. संकरीत वाणासाठी 5–6 किलो/हेक्टर पुरेसे असते.

Seed Quantity | Agrowon

योग्य वाणांची निवड

फुले भास्कर, भानू, SS-56 हे सुधारित वाण चांगले आहेत. KBSH-44, फुले रविराज, MSFH-17 हे संकरीत वाण उपयुक्त आहेत.

Selection of Variety | Agrowon

बीजप्रक्रिया महत्त्वाची

थायरम 2–2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळा. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद जिवाणू खत वापरल्यास उगवण चांगली होते.

Seed Treatment | Agrowon

खत व्यवस्थापन

नत्र 60, स्फुरद 30 व पालाश 30 किलो प्रति हेक्टर द्या. अर्धे नत्र पेरणीवेळी व उरलेले 1 महिन्यानंतर द्या.

Fertilizer Application | Agrowon

निष्कर्ष

योग्य पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन नक्की वाढते. उन्हाळी सूर्यफूल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक ठरते.

Conclusion | Agrowon

Maize Armyworm: मक्यावरील लष्करी अळीवरील फवारण्या फेल का होतात? जाणून घ्या चुका!

Agrowon
अधिक माहितीसाठी...