Palas Tree : रखरखत्या उन्हात डोळ्यांना सुखावणाऱ्या बहुगुणी पळसाचा असाही उपयोग

Team Agrowon

फेब्रुवारी-मार्च आला की वसंत ऋतूची चाहूल लागते. पळस बहरतो.

Palas Tree | Agrowon

दुतर्फा रानवाटांमधून आपल्याच नादात फुललेला पळस दिसतो. त्याच्या अंगाखांद्यावर सजलेला केशरी फुलांचा सोहळा पथिकांना संमोहित केल्याशिवाय राहात नाही.

Palas Tree | Agrowon

खडक फोडून पळस असा काही फुलतो की आसमंत अग्निज्वालांनी लपेटून गेल्याचा भास होतो. म्हणूनच त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ म्हणतात.

Palas Tree | Agrowon

निसर्ग, पळसाकडून शिकण्यासारखे खूप आहे. सुख-दुःख आयुष्यात ऋतूंप्रमाणे येते- जाते. आयुष्य खडकाप्रमाणेच असते.

Palas Tree | Agrowon

बंजारा समाजात पळस फुलांना ‘केसुला’ म्हणतात. पायाखाली खडक. क्यावर कडक ऊन अशा प्रतिकूल परिस्थितीत माळरानावर केसूला निसर्गात रंग भरतो.

Palas Tree | Agrowon

पळसाच्या फळशेंगांचे बीज म्हणजे पापडी. त्या उगाळून बाळगुटीत दिल्या जातात. आयुर्वेदाचार्यांच्या मते त्या कृमिनाशक आहेत.

Palas Tree | Agrowon

थंडीचा काटा सरला की होळी सण येतो. रंगांच्या उत्सवासाठी पळसाच्या फुलांचा वापर होतो. कुयरीसारखा आकार असलेली ही फुले आकर्षक भासतात.

Palas Tree | Agrowon

खेड्यांमध्ये रंगपंचमीला पळसाची फुले खलबत्त्यात कुटून ती स्वच्छ पाण्यात भिजवितात. त्यापासून तयार झालेला नैसर्गिक रंग आल्हाददायक असतो.

Palas Tree | Agrowon

पळस बहुगुणी आहे. त्याच्या पानांपासून गाव-खेड्यांमध्ये पत्रावळी, द्रोण तयार करतात. लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांमधून भोजनासाठी त्यांचा वापर करण्यात येतो.

Palas Tree | Agrowon