Team Agrowon
जनावरांना दिला जाणारा चारा रुचकर असावा. चारा एकदम लहान बारीक कुट्टी करू देऊ नये. कुट्टीचा आकार १ ते २ इंच राहिल्यास जनावरांचे रवंथ उत्तम होऊन चारा व्यवस्थित पचतो. त्याबरोबरच दुधातील फॅटचे प्रमाण उत्तम राहण्यास मदत होते.
चारा जशास तसा लांब धाटे न देता कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा एकत्र मिसळून द्यावा. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळून पचनीयता वाढते.
जनावरांना चारा खाऊ घालताना जनावराचे शरीर वजन, शरीरवाढ, कार्यशिलता (बैलांमध्ये) लक्षात घेऊन चारा योग्य प्रमाणात द्यावा.
सरसकट सर्वांना समान चारा देऊ नये. जनावरांची वर्गवारी करून चारा दिल्यास जनावरांचे आरोग्य उत्तम राहून जास्तीचे उत्पादनही मिळते. अपव्यय टाळला जातो.
चारा खाण्यासाठी सर्व जनावरांना योग्य प्रमाणात जागा व चारा उपलब्ध करून द्यावा. ६) जनावरांना केवळ हिरवा चारा किंवा वाळलेला चारा न देता दोन्हींचे योग्य प्रमाणात मिश्रण द्यावे.
जनावरांना सतत चारा न देता दिवसातून केवळ २ ते ३ वेळा योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. यामुळे रवंथ चांगले होऊन चाऱ्याची पचनीयता वाढते व पोषणतत्वांचा वाढीव उत्पादनासाठी उपयोग होतो.
चारा खाऊ घालण्याच्या वेळा ठराविक देवून त्यात अचानक बदल होणार नाही याची काळजी घ्यावी. सतत केवळ एकाच प्रकारचा चारा न देता २ ते ३ चारा पिकांचे मिश्रण द्यावे, यामुळे आवश्यक सर्व पोषणतत्त्वे मिळायची शक्यता वाढते.
Jowar Soil Moisture Conservation : ज्वारीत वेळेवर कोळपणी करण्याचे फायदे