Animal Care : बायपास फॅट दुभत्या गायी, म्हशींसाठी वरदान

Team Agrowon

रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट चार कप्प्यांमध्ये विभागलेले असते. यामध्ये कोठीपोट, जाळीपोट, पडदे पोट, खरे पोट हे चार भाग येतात.

Animal Care | Agrowon

सर्वसाधारणपणे जनावरांनी कोणत्याही प्रकारचे खाद्य खाल्ल्यानंतर ते रुमेनमध्ये जाऊन बसते. जनावर विश्रांती करत असताना हे खाल्लेलं अन्न तोंडात घेऊन त्याचे चर्वण केले जाते. याच प्रक्रियेला रवंथ असे म्हटले जाते.

Animal Care | Fodder Shortage

बायपास फॅट जनावरांच्या पहिल्या तीन पोटामध्ये न पचता शेवटच्या पोटामध्ये पचवून पोषक तत्वे शोषली जातात. बायपास फॅटचे पचन दुभत्या जनावरांच्या कोठीपोटात न होता, सरळ आतड्यामध्ये होते.

Animal Care

बायपास फॅट पासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाते. परिणामी दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.

Animal Care

दूध उत्पादन, प्रजननासाठी लागणारी उर्जा बायपास फॅट द्वारे दुभत्या जनावरांना उपलब्ध होते.

Animal Care | Agrowon

गायी-म्हशींना दिले जाणारे खाद्य, चारा यांसारख्या घटकांचे पचन करण्याचे काम कोठीपोटात लाखोंच्या संख्येने असलेले सूक्ष्म जीवाणू करत असतात.

Animal Care | Agrowon

चांगल्या प्रकारची प्रथिने, स्निग्ध पदार्थ जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायीं म्हशींना लगेचच उपलब्ध होत नाहीत, म्हणूनच बायपास फॅटचे संतुलित पशु आहारात महत्व जास्त आहे. कारण ते थेट आतड्यांमध्ये पचनासाठी उपलब्ध होते.

Animal Care | Agrowon

बायपास फॅटमुळे जनावरांच्या शरीरातील उर्जेची गरज पूर्ण होते, वासरांची दैनंदिन योग्य वाढ होते, कालवडी योग्य वयात माजावर येतात. दुधाळ गायी-म्हशी चांगल्या दुधाचे उत्पादन देऊ शकतात.

Animal Care | Agrowon

Animal Care : ओळखा जनावरांतील वंध्यत्वाची कारणे

Animal Care | Agrowon