Vegetable Mulching : भाजीपाला पिकात करा आच्छादनाचा वापर ; होतील फायदेच फायदे

Team Agrowon

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते. अशा वेळी आच्छादन केल्यास झाडांजवळील जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवला जातो. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पाण्याची देखील बचत होते. जमिनीत ओलावा टिकवून ठेवला जातो.

Vegetable Mulching | Agrowon

आच्छादनासाठी पॉलिथिन मल्च, गवत, पालापाचोळा इत्यादींचा वापर करता येतो. आच्छादन केल्यामुळे फळ धारणा झाल्यानंतर फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळाची प्रत खराब होण्याचा धोका टाळला जातो.

Vegetable Mulching | Agrowon

जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. तणांचा बंदोबस्त होतो.

Vegetable Mulching | Agrowon

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कलिंगड, ढेमसे आणि खरबूज तसेच मिरची, वांगी, टोमॅटो या पिकांमध्ये आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो.

Vegetable Mulching | Agrowon

मुळांच्या भोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते. बीज उगवणक्षमतेत वाढ होते.

Vegetable Mulching | Agrowon

प्लॅस्टिक आच्छादनामुळे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढून प्रकाश संश्‍लेषणाला मदत होते.

Vegetable Mulching | Agrowon

गादीवाफ्यावर पाणी साचून राहात नाही. रोपांची वाढ व्यवस्थित होते. आंतरमशागतीची कामे कमी होतात आणि एकंदरीत उत्पादन खर्चात बचत होते.

Vegetable Mulching | Agrowon
आणखी पाहा....