Livestock Infertility : राज्यातील ३० टक्के पशुधन प्रजननासाठी सक्षम नाही?

Team Agrowon

राज्यातील एकूण प्रजननक्षम पशुधनाच्या ३० टक्क्यांहून अधिक पशुधन प्रजननासाठी सक्षम नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वंध्यत्व निवारण शिबिरांमधून समोर आले आहे.

Animal Infertility | Agrowon

नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये राबविण्यात आलेल्या ३९ हजार २९ वंध्यत्व निवारण शिबिरांमध्ये ही बाब लक्षात आली आहे.

Animal Infertility | Agrowon

पशुसंवर्धन विभागाने तब्बल ३९ हजार २९ वंध्यत्व निवारण शिबिरे घेतली. त्यात ५ लाख ३१ हजार ४३३ गाई व म्हशींची तपासणी करण्यात आली.

Animal Infertility | Agrowon

चार लाख १८ हजार ९९३ गाई व म्हशींवर उपचार करण्यात आले.

Animal Infertility | Agrowon

निदान झालेल्या १३२३ गाई व म्हशींचे वंदत्व निवारण करण्यात आले तर ३८४ गायी व म्हशींवर कृत्रिम रेतन करण्यात आले.

Animal Infertility | Agrowon

सद्यःस्थितीत राज्यातील पैदास क्षम गाई, म्हशींच्या संख्येच्या तुलनेत केवळ १८ टक्के गाई आणि म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केले जाते.

Animal Infertility | Agrowon

राज्यात वंधत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाई, म्हशींची संख्या जवळपास ४० लाख आहे. त्यामुळे याचा दुग्ध उत्पादनावर मोठा परिणाम होतो.

Animal Infertility | Agrowon