Aslam Abdul Shanedivan
पेरू हे एक हंगामी फळ असून हे पोषक तत्वांनी भरलेले असून यात आवश्यक जीवनसत्त्वे खनिजे आणि भरपूर फायबर असते. यामुळे हे आरोग्यासाठी उत्तम आहे.
पेरू शिवाय पेरूची पाने देखील आरोग्यासाठी महत्वपूर्ण असून पेरूची पाने शरीरातील हायपरग्लाइसेमिया म्हणजेच साखरेचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करतात.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रथिने असतात. जी त्वचा आणि केसांसाठी आवश्यक असतात. पेरूच्या पानांनी अंघोळ केल्याने मुरुम, डाग, ऍलर्जी, पुरळ इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते.
गरम पाण्यात भिजवलेली पेरूची पाने तुमच्या चेहऱ्यावर क्लींजर किंवा टोनर म्हणून वापरू शकता. ते त्वचेचा पोत सुधारण्यास आणि मुरुम कमी करण्यास मदत करू शकते.
केवळ पेरूच नाही तर पेरूची पानेही मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधा पेक्षा कमी नाहीत. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने इन्सुलिनची पातळी बऱ्याच प्रमाणात सुधारते.
पेरूच्या पानांमध्ये टॅनिन आणि पॉलीफेनॉलसारखे रसायन असते, जे मधुमेहाची समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करतात.
पेरूच्या पानांचा उष्टा हिवाळ्यात थंडीपासून आराम देतो. हे प्यायल्याने डोकेदुखी आणि छातीत दुखण्यापासून लगेच आराम मिळतो.