sandeep Shirguppe
आज होणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी किंवा शरद पौर्णिमा म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला खूप महत्त्वाचे मानले.
आश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध प्राशनाला महत्त्व आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करतात.
कोजागिरीला मसाल्याचे दूध पिण्याची परंपरा आहे. मसाल्याचे हे दुध आपल्याला अनेकप्रकारे फायदे मिळवून देणारे आहे.
मसाले दुधासाठी घरीच मसाला बनवा. तुम्ही हा मसाला ताजाही वापरू शकता अन् तो साठवूनही ठेऊ शकता.
एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्त्व असतं हे तत्त्व चंद्राच्या किरणांमधून अधिक मात्रेत शक्ती खेचते.
कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरिता लाभदायक असतात.
चंद्राचे दुधामध्ये प्रतिबिंब पाहून पूजन करून नमस्कार करावा व ते दूध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे.
विविध ड्रायफ्रुट्स आणि स्वादिष्ट मसाल्यांनी बनवलेले मसाले दूध सर्वांसाठी चांगले आहे.