Fenugreek Seeds For Hair : केसांच्या सर्व समस्यांवर मेथी दाणे आहेत रामबाण उपाय; जाणून घ्या वापराचे सोपे मार्ग!

Anuradha Vipat

आयुर्वेदिक वरदान

मेथीचे दाणे केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक वरदान मानले जातात.

Fenugreek Seeds For Hair | agrowon

केस गळती

यामध्ये प्रथिने , निकोटिनिक ॲसिड आणि लेसिथिन मुबलक प्रमाणात असते, जे केस गळती थांबवून कोंडा मुळापासून नष्ट करते.

Fenugreek Seeds For Hair | Agrowon

मेथी दाण्यांचे हेअर ऑईल

तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे टाका. दाणे काळे होईपर्यंत तेल उकळू द्या. नंतर तेल थंड करून गाळून घ्या. आठवड्यातून २-३ वेळा या तेलाने टाळूला मसाज करा.

Fenugreek Seeds For Hair | Agrowon

मेथी आणि दह्याचा हेअर मास्क

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते मिक्सरमध्ये वाटून मऊ पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये दही नीट मिक्स करा. हा मास्क टाळूवर आणि केसांवर लावा.

Fenugreek Seeds For Hair | Agrowon

मेथी आणि कोरफडीचा मास्क

२ चमचे भिजवलेली मेथी पेस्ट आणि २ चमचे ताजी कोरफडीचा गर दोन्ही घटक एकत्र करून एकजीव पेस्ट तयार करा. हा पॅक केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा.

Fenugreek Seeds For Hair | Agrowon

मेथीचे पाणी - नॅचरल हेअर सीरम

मेथी दाणे रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. केस शॅम्पूने धुऊन झाल्यावर, हे मेथीचे पाणी केसांवर आणि टाळूवर ओता.

Fenugreek Seeds For Hair | agrowon

Weight Loss Mistakes : मेहनत करूनही वजन घटत नाही? तुमच्या वजनाचा काटा अडकण्यामागची ५ मुख्य कारणे

Weight Loss Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...