Anuradha Vipat
सध्या सगळीकडे युरिया खताची टंचाई जाणवत आहे. आता युरिया खताची टंचाई ही एक नवीनचं समस्या झाली आहे.
अनेक राज्यांमध्ये पाऊस झाल्यामुळे पेरण्या वाढल्या आहेत. युरियाचा अधिक वापर होणाऱ्या पिकांखालील क्षेत्र वाढल्याने मागणी वाढली आहे.
डाय-अमोनियम फॉस्फेट या खतांची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतकरी पर्याय म्हणून युरियाचा वापर करत आहेत
युरियाला मिळणाऱ्या मोठ्या सरकारी अनुदानामुळे तो स्वस्त आहे. यामुळे शेतकरी आवश्यकतेपेक्षा जास्त युरिया वापरतात
आता चीनसारख्या प्रमुख निर्यातदार देशांनी स्थानिक मागणीमुळे युरियाच्या निर्यातीवर निर्बंध आणले आहेत
रशिया-युक्रेन संघर्ष आणि इराण-इस्रायलमधील तणावामुळे युरियाची मागणी वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाच्या किमती वाढल्यामुळे आयात करणे अधिक महाग झाले आहे.