Anuradha Vipat
बनावट बियाणे ,खते तसेच इतर कृषी-संबंधित समस्यांसाठी तक्रार नोंदवण्यासाठी भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.
टोल-फ्री क्रमांकावर शेतकरी बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांपासून सावध आणि त्यांची तक्रार करु शकतात.
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हा टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.
तक्रार नोंदवण्यासाठी शेतकरी १८००-१८०-१५५१ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
या क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर तुमची ओळख गोपनीय ठेवली जाते
काही जिल्ह्यांसाठी सरकारने विशिष्ट क्रमांक जारी केले आहेत.
कृषी विभाग बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करते.