Digestion Tips : दिवाळीचा फराळ खाऊन पोट बिघडले? पचनक्रिया सुधारण्यासाठी फॉलो करा हा खास डाएट प्लॅन!

Anuradha Vipat

सर्वात उत्तम उपाय

दिवाळीचा तळलेला आणि गोड फराळ खाऊन पोट बिघडले असेल, तर पचनसंस्थेला आराम देणारा हलका आणि सात्विक आहार घेणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

Digestion Tips | Agrowon

डाएट प्लॅन

अशावेळी पोटावर ताण येईल असे जड पदार्थ टाळून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करणारा डाएट प्लॅन पाळणे आवश्यक असते.

Digestion Tips | Agrowon

ओवा आणि सैंधव मीठ

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ घालून प्या. यामुळे गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो.

Digestion Tips | agrowon

नाश्ता

पचायला अत्यंत हलके पदार्थ खा. यामध्ये पातळ मुगाची खिचडी, उपमा किंवा मऊ शिजवलेला भात आणि ताक यांचा समावेश करा.

Digestion Tips | agrowon

दुपारचे जेवण

वरण-भात आणि त्यावर साजूक तुपाची धार असा साधा आहार घ्या. सोबत जिरे आणि हिंग घातलेले ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

Digestion Tips | agrowon

संध्याकाळचा खाऊ

चहा किंवा कॉफी पूर्णपणे टाळा. त्याऐवजी आल्याचा चहा, पुदिन्याचे पाणी किंवा एक पिकलेले केळे खा.

Digestion Tips | agrowon

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण शक्य तितके हलके ठेवा. यामध्ये भाज्यांचे गरम सूप किंवा पालेभाजी आणि ज्वारीची भाकरी खाऊ शकता.

Digestion Tips | Agrowon

Post Diwali Weight Loss : दिवाळीतील गोडधोड खाल्ल्यानंतर वजन वाढले? घरच्या घरी वजन कमी करण्याचे रामबाण उपाय!

Post Diwali Weight Loss | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...