Anuradha Vipat
दिवाळीतील गोडधोड आणि तळलेला फराळ खाल्ल्यानंतर शरीरात अतिरिक्त कॅलरीज आणि पाणी साचल्याने वजन वाढलेले दिसते.
संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित हालचाल या त्रिसूत्रीचा वापर करून तुम्ही हे वाढलेले वजन नैसर्गिकरीत्या आणि सुरक्षितपणे कमी करू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा मध घालून प्यायल्याने पचनसंस्था सुधारते आणि चयापचय वेगवान होते.
रात्रभर एक चमचा जिरे किंवा ओवा पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून प्या.
पुढील १५ दिवस चहा, कॉफी किंवा मिठाईतील साखर आणि बेकरीचे पदार्थ बंद करा.
आहारात मूग डाळ, पनीर, अंडी, कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि अनावश्यक खाणे टळते.
दिवसातून दोन वेळा साध्या दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी, आल्याचा काढा किंवा दालचिनीचे पाणी प्या.