Anuradha Vipat
यंदाच्या सणासुदीच्या आणि दिवाळीच्या हंगामात पारंपरिक डिझाईन्सना आधुनिक टच देणारे कपडे बाजारात मोठ्या प्रमाणावर पसंत केले जात आहेत.
सध्या सिल्क, बांधणी किंवा चंदेरी फॅब्रिकमधील को-ऑर्ड सेट्स खूप ट्रेंडिंग आहेत.
जड लेहेंग्याऐवजी महिला शरारा सूटला पसंती देत आहेत. शॉर्ट कुर्ता आणि घेरदार शरारा यासोबत हेवी दुपट्टा असा लुक फेस्टिव्हलसाठी परफेक्ट ठरतो.
पारंपरिक पैठणी किंवा काठापदराच्या साड्यांपासून बनवलेले लाँग जॅकेट्स, केप गाऊन्स किंवा धोती पँट्ससोबत सिल्क श्रगचा ट्रेंड सध्या जोरात आहे.
फ्लोरल प्रिंटेड ऑर्गेंझा साड्या आणि हलक्या रंगाचे लेहेंगे डे-टाईम फंक्शन्स किंवा पाडवा-भाऊबीजेच्या दिवशी तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत.
फ्लोअर लेंथ अनारकली कुर्त्यावर हेवी एम्ब्रॉयडरी असलेले वेगळे काढता येणारे लाँग जॅकेट किंवा कोटी घालण्याचा ट्रेंड यंदा पाहायला मिळत आहे.
हा एक अत्यंत आधुनिक आणि स्टायलिश फ्युजन प्रकार आहे. प्लेन किंवा प्रिंटेड पलाझो पँट, त्यावर मॅचिंग क्रॉप टॉप आणि वरून जॉर्जेटचा लाँग फ्लोई श्रग घातल्याने एक इंडो-वेस्टर्न आणि फॅशनेबल लुक तयार होतो.