Anuradha Vipat
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असला, तरी फटाके उडवताना होणारे अपघात आणि प्रदूषण यांमुळे सणाचा रंग बेरंग होऊ शकतो.
या दिवाळीत स्वतःची सुरक्षा राखण्यासाठी फटाके खरेदी करताना आणि ते उडवताना कोणती काळजी घ्यावी, याच्या महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
ग्रीन फटाक्यांच्या बॉक्सवर नेहमी 'CSIR-NEERI' चा हिरवा लोगो आणि एक QR Code असतो. खरेदी करताना हा लोगो पाहूनच फटाके घ्या.
हे फटाके पारंपरिक फटाक्यांपेक्षा ३०% कमी प्रदूषण करतात आणि यातून हानिकारक सल्फर व कार्बनचे उत्सर्जन खूप कमी होते.
फटाके नेहमी परवानाधारक आणि अधिकृत गाळ्यांमधूनच खरेदी करा. रस्त्यावरील तात्पुरत्या अनधिकृत स्टॉल्सवरून फटाके घेणे टाळा.
फटाके तयार करताना बालमजुरांचा वापर केला जातो. त्यामुळे शक्यतो नामांकित आणि विश्वासार्ह ब्रँड्सचेच फटाके निवडा.
फटाक्यांचे पॅकिंग व्यवस्थित कोरडे असावे. ओलसर किंवा खराब झालेले पॅकिंग असलेले फटाके खरेदी करू नकात.