Aslam Abdul Shanedivan
शेती व्यवसायाबरोबर इतर व्यवसायातून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मध केंद्र योजना सुरू करण्यात आली आहे.
मध केंद्र योजनेतून हा व्यवसाय करणाऱ्यास ५० पर्यंत सबसिडी राज्य शासनाकडून देण्यात येते
पण देशात बिहार असे राज्य आहे जिथे मधमाशी पालनासाठी ९० % पर्यंत सबसिडी देत आहे.
याबाबत बिहार सरकारने अधिसूचना काढली आहे. यात मध वसाहती, मधमाशांच्या पेट्या, मध काढण्यासाठी उपकरणे आणि प्रक्रिया करण्यासाठी ओपन श्रेणी शेतकऱ्यांना ७५ % सबसिडी देत आहे
तर बिहार राज्यातील एससी आणि एसटी श्रेणीतील शेतकऱ्यांना ९० % पर्यंत सबसिडी दिली जाते
या बाबत माहिती फलोत्पादन विभागाच्या अधिकृत वेबसाइट http://horticulture.bihar.gov.in/ वर आहे
बिहार व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये मधमाशीपालनावर अनुदान दिले जाते. झारखंडमध्ये यासाठी ८० % पर्यंत सबसिडी दिली जाते