Anuradha Vipat
श्रावण महिन्यामध्ये फोटोशूटसाठी तुम्ही विविध थीम निवडू शकता. श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो.
श्रावण महिन्यात फोटोशूट करणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार थीम निवडू शकता.
श्रावण महिन्यात फोटोशूटसाठी महादेवाच्या वेशभूषेत मुलांचे किंवा कुटुंबाचे फोटो काढा
सोवळ्यात किंवा पारंपरिक साडीमध्ये महिलांचे मंदिरात पूजा करतानाचे फोटो काढा
पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी, फेटा, अशी वेशभूषा तुम्ही करु शकता
लहान बाळाचे कृष्णाच्या वेशभूषेतील फोटोशूट करण्यासाठी बासरी, मटकी आणि मोरपिस यांचा वापर करा
श्रावण महिन्यात शुक्रवारी महालक्ष्मी व्रत केले जाते त्यामुळे महालक्ष्मीच्या पूजेचे स्वरूप देऊन फोटोशूट करा.