Aslam Abdul Shanedivan
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलची ५५ वी बैठक २१ डिसेंबर (शनिवार) रोजी पार पडली.
यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, वित्त सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही जैसलमेरला पोहोचले होते.
पॉपकॉर्नवर तीन प्रकारचा जीएसटी लावण्यात आला आहे. ज्यामध्ये कॅरामलाइज्ड पॉपकॉर्नवर १८%, रेडी-टू-इट पॉपकॉर्नवर ५ टक्के आणि रेडी-टू-इट पॉपकॉर्नवर १२% जीएसटी असेल
जीएसटी कौन्सिलने फोर्टिफाइड तांदळावरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणला आहे.
मिरी आणि मनुका यांना जीएसटीमधून सूट दिली जाईल.
या बैठकीत आरोग्य जीवन विम्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर १८% जीएसटी असेल
कॅन्सरची जीन थेरपी जीएसटीमुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.