Aslam Abdul Shanedivan
चिया बिया सुपरफूड असून यात व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात
चिया बियांचे नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय, शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते.
पण चिया सीड्स बीन्स, कडधान्य आणि ब्रोकोली असे उच्च फायबरयुक्त पदार्थांसह खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो. गॅस आणि पोट फुगू शकते.
चिया सीड्स दूध किंवा दुग्धजन्य पदार्थात मिसळून खाऊ नयेत. असे केल्यास पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
चिया बिया जास्त साखर असलेल्या पदार्थांसह खाऊ नयेत? असे केल्याने तुमचे हार्मोन्स बिघडू शकतात आणि रक्तातील साखरही वाढू शकते
चिया बियाण्यांसोबत कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवन कधीही करू नये. यामुळे शरीरात डिहायड्रेशन आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
चिया बियांसोबत जास्त मीठ असलेल्या गोष्टींचे सेवन टाळावे. यामुळे पचनाच्या समस्या आणि उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)