Bull Market : जातिवंत पहाडी बैलांचा फेमस गुरांचा बाजार

Mahesh Gaikwad

जातिवंत गायी, बैल

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे भरणारा जनावरांचा बाजार हा जातिवंत बैल, गायी आणि म्हशींच्या खरेदीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे.

Bull Market | Photo - vinod Ingole

पहाडी बैल

मध्य प्रदेशच्या भैसदेही जिल्ह्याच्या सीमा या तालुक्‍याशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील प्रसिद्ध पहाडी बैल देखील बाजारात खेरदी-विक्रीसाठी येतात.

Bull Market | Photo - vinod Ingole

बाजाराची उलाढाल

दर रविवारी भरणाऱ्या या बाजाराची वार्षिक उलाढाल क्षमता १६० ते १८७ कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

Bull Market | Photo - vinod Ingole

जनावरांचा बाजार

चांदूरबाजार बाजार समितीची स्थापना २३ मे १९७४ मध्ये झाली. त्यानंतर काही वर्षांतच जनावरांचा बाजार भरविण्यास सुरुवात झाली.

Bull Market | Photo - vinod Ingole

गावरान गायी- म्हशींच्या जाती

या बाजारात मराठवाड्यातील लाल कंधारीसह अन्य जाती, जर्सी, काठियावाडी, एचएफ, मुऱ्हा, गुजर यासह अन्य गावरान गायी- म्हशींच्या जातींही खरेदी-विक्रीसाठी येतात.

Bull Market | Photo - vinod Ingole

शेळ्या-मेंढ्यांनाही मागणी

दुधाळ जनावरांबरोबर शेळ्या-मेंढ्यांनाही बाजारात मागणी राहते. हंगामनिहाय शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीचे प्रमाण २५० ते ४०० याप्रमाणे आहे.

Bull Market | Photo - vinod Ingole

बाजारस्थळी सुविधा

बाजारस्थळी जनावरे बांधण्यासाठी लोखंडी रेलिंग, बाजारात फिरण्यासाठी अंतर्गत सिमेंट रस्ते, जनावरांना चढण्या-उतरण्यासाठी 'रॅम्प' अशा सुविधा बाजार समितीकडून देण्यात आल्या आहेत.

Bull Market | Photo - vinod Ingole

नागोर जातीचे बैल

गावरान तसेच मध्यप्रदेशात मिळणाऱ्या जातिवंत नागोर बैलांची उलाढाल चांदूर बाजारात मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांची मागणी असल्याने छिंदवाडा (बरघाट) तसेच भंडारा भागातील गावरान, नागोर जातीचे बैलही खरेदीसाठी येथे उपलब्ध असतात.

Bull Market | Photo - vinod Ingole