Anuradha Vipat
न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा एक गंभीर संसर्ग आहे, ज्यामुळे एका किंवा दोन्ही फुफ्फुसांतील हवेच्या पिशव्यांमध्ये सूज येते आणि त्यामध्ये द्रव किंवा पू भरतो.
हा आजार प्रामुख्याने जिवाणू , विषाणू किंवा बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. यामुळे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडथळा निर्माण होतो.
खोकल्यासोबत पिवळा, हिरवा किंवा काही वेळा रक्तामिश्रित कफ पडणे.
तीव्र ताप येणे आणि अंगात जोरात थंडी भरणे किंवा घाम येणे. श्वास घेण्यास त्रास होणे.
श्वास घेताना किंवा खोकताना छातीत तीव्र कळा येणे. अतिशय थकवा जाणवणे.
शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी पुरेशा आरामाची गरज असते. पूर्ण बशारी मिळेपर्यंत शारीरिक कष्टाची कामे टाळा.
कफ पातळ होऊन बाहेर पडण्यासाठी कोमट पाणी, सूप, किंवा फळांचा रस भरपूर प्रमाणात घ्या.