Home Safety Tips : घराची सुरक्षितता वाढवायची आहे? आजच करा हे सोपे आणि महत्त्वाचे बदल!

Anuradha Vipat

महत्त्वाचे बदल

घरामध्ये लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी घरात करायचे महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहे.

Home Safety Tips | Agrowon

'अँटी-स्लिप' मॅट्स किंवा कोटिंग्ज

बाथरूममध्ये आणि ओल्या जमिनीवर 'अँटी-स्लिप' रबर मॅट्स टाकाव्यात. जिना किंवा गुळगुळीत फरशीवर घर्षण वाढवणारे कोटिंग किंवा पट्ट्या बसवाव्यात.

Home Safety Tips | Agrowon

'चाइल्डप्रूफिंग'

लहान मुलांचा हात पोहोचेल अशा ठिकाणच्या सर्व उघड्या सॉकेट्सना प्लास्टिक सेफ्टी प्लग्ज लावावेत. खराब किंवा जुन्या झालेल्या वायर्स ताबडतोब बदलून घ्याव्यात.

Home Safety Tips | Agrowon

'स्मार्ट अलार्म'

गॅस शेगडीजवळ 'गॅस लीक डिटेक्टर्स' आणि किचनमध्ये किंवा हॉलमध्ये 'स्मोक अलार्म' बसवावा. तसेच स्वयंपाक झाल्यावर गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर रात्री आवर्जून बंद करण्याची सवय ठेवावी.

Home Safety Tips | Agrowon

'स्मार्ट डिजिटल लॉक'

जुन्या साध्या कुलूपांऐवजी मुख्य दरवाजाला डिजिटल डोअर लॉक व्हिडिओ डोअर फोन किंवा किमान एक मजबूत सेफ्टी डोअर आणि 'आय-होल' बसवावे.

Home Safety Tips | Agrowon

कॉर्नर गार्ड्स'

टेबल, बेड किंवा कपाटांच्या तीक्ष्ण कोपऱ्यांना 'कॉर्नर गार्ड्स' लावावेत.

Home Safety Tips | Agrowon

औषधे-केमिकल्स उंचावर ठेवणे

घरातील सर्व औषधे, फिनाईल, ॲसिड आणि धारदार वस्तू लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत अशा उंचावरील लॉक असलेल्या कपाटात ठेवाव्यात.

Home Safety Tips | Agrowon

Senior Citizen Health : वयाच्या ६० नंतर त्वचा कोरडी पडतेय? वापरा आजीच्या बटव्यातील हे नैसर्गिक उपाय

Senior Citizen Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...