Anuradha Vipat
हिंदू धर्मात घराचा 'उंबरठा'अत्यंत पवित्र मानला जातो. उंबरठा पूजन करण्याचे महत्त्व आणि पद्धत खालीलप्रमाणे आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये आणि घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ नये यासाठी उंबरठा पूजन केले जाते.
उंबरठ्यावर 'अधोशक्ती' आणि 'क्षेत्रपाल' देवतांचा वास असतो.
भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावरच केला होता त्यामुळे या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .
उंबरठा पूजन दररोज सकाळी किंवा विशेष सणांच्या दिवशी करणे शुभ असते.
उंबरठा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. उंबरठ्याला शेणाने किंवा हळद-पाण्याच्या मिश्रणाने लेपण करा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद-कुंकू वाहा.
मध्यभागी स्वस्तिक किंवा ओम काढावा. उंबरठ्यावर थोडे अक्षता आणि फूल अर्पण करावे. उंबरठ्याजवळ अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा ओवाळावा.