Anuradha Vipat
सतत वाईट स्वप्ने पडणे किंवा झोपेत भीती वाटणे या समस्यांवर मात करण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरू शकतात.
झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर टाळा.
शांत बसून ५-१० मिनिटे दीर्घ श्वासोच्छवास केल्याने मन शांत होते
झोपण्यापूर्वी 'हनुमान चालीसा' किंवा 'रामरक्षा स्तोत्र' वाचल्याने भीती कमी होण्यास मदत होते.
रात्री पाय स्वच्छ धुवून आणि कोरडे करून झोपावे. तळपायांना तेलाने मसाज केल्याने शांत झोप लागते .
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोके करून झोपणे मानसिक शांततेसाठी उत्तम मानले जाते .
झोपण्यापूर्वी 'श्रीराम', 'विष्णू', 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'ॐ नमः शिवाय' यांसारख्या मंत्रांचा जप करा.