Anuradha Vipat
हिवाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी किंवा निसर्गरम्य पर्यटनाला जाण्याची मजा काही औरच असते.
प्रवासादरम्यान कडाक्याची थंडी, कोरडी हवा आणि बदलत्या वातावरणामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी बॅग भरताना 'या' महत्त्वाच्या वस्तू सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
थंडीपासून वाचण्यासाठी जाड कपड्यांपेक्षा आतून थर्मल इनरवेअर घालणे अधिक प्रभावी ठरते. हे वजनाला हलके असतात आणि शरीराची उष्णता टिकवून ठेवतात.
थंड वारा रोखण्यासाठी चांगल्या दर्जाचे विंडप्रूफ किंवा पफर जॅकेट सोबत ठेवा. संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळी हे अत्यंत उपयोगी पडते.
शरीराची सर्वाधिक उष्णता डोके, कान आणि हातांमधून बाहेर पडते. त्यामुळे लोकरीची कानटोपी, मफलर आणि हातमोजे बॅगेत नक्की ठेवा.
पायांना थंडी लागू नये म्हणून लोकरीचे मोजे आणि चालण्यासाठी मजबूत ग्रिप असलेले बंद शूज सोबत घ्या.
बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा अंगदुखी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक गोळ्या, बाम, इनहेलर आणि बँड-एड सोबत ठेवा.