Anuradha Vipat
घरच्या कुंडीतील तुळशीचे रोप सुकू नये, ते नेहमी हिरवेगार, टवटवीत आणि घनदाट राहावे यासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेकदा अयोग्य प्रमाणात पाणी देणे, सूर्यप्रकाशाचा अभाव किंवा मंजिरी न काढणे यामुळे तुळस सुकू लागते.
तुळशीच्या रोपाला जेव्हा मंजिरी येतो, तेव्हा तो लगेचच हाताने किंवा कात्रीने कापून वेगळा करा.
कुंडीतील माती वरून १ इंच कोरडी वाटली तरच पाणी द्या. नेहमी जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात आणि पाने पिवळी पडून झाड मरते.
तुळशीला दररोज ४ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कुंडी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी.
महिन्यातून एकदा कुंडीतील माती हलकीशी खुरपून घ्या, जेणेकरून मुळांना ऑक्सिजन मिळेल.
तुळशीवर बारीक काळे कीटक किंवा बुरशी जमा झाल्यास, कडुलिंबाचे पाणी पानांवर फवारवे.