Anuradha Vipat
शरीराचा दुबळेपणा दूर करण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे आणि जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही निरोगी पद्धतीने वजन वाढवू शकता आणि शरीरातील ताकद वाढवू शकता.
दररोज सकाळी २ केळी खाऊन एक ग्लास कोमट दूध प्यावे. वजन वाढवण्यासाठी आणि शरीराला झटपट ऊर्जा मिळवून देण्यासाठी हा सर्वात जुना आणि उत्तम उपाय आहे.
रात्री ६-७ बदाम आणि १०-१२ मनुके पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर बदामाची साले काढून ते मनुकांसोबत चावून खा.
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात १-२ चमचे शुद्ध तुपाचा वापर करा. तुम्ही तूप आणि गूळ एकत्र करूनही खाऊ शकता, यामुळे शरीराची ताकद वाढते.
अश्वगंधा आणि शतावरी चूर्ण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि वजन वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते
शरीराला अन्नाइतकीच आरामाचीही गरज असते. त्यामुळे दररोज ७ ते ८ तासांची गाढ झोप नक्की घ्या.