Anuradha Vipat
त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून रक्षण करण्यासाठी आणि अकाली वृद्धत्व तसेच टॅनिंग रोखण्यासाठी योग्य सनस्क्रीन निवडणे अत्यंत गरजेचे आहे.
बाजारात अनेक प्रकारची सनस्क्रीन उपलब्ध असल्याने आपल्या त्वचेनुसार योग्य निवड कशी करावी, याच्या सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
सनस्क्रीन खरेदी करताना त्यावर 'Broad Spectrum' लिहीले आहे का ते नक्की तपासा. हे सनस्क्रीन UVA आणि UVB या दोन्ही प्रकारच्या किरणांपासून संरक्षण करते.
जर तुम्ही जास्त वेळ उन्हात घालवणार असाल किंवा पोहायला जाणार असाल, तर SPF 50 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन निवडा.
सनस्क्रीनवर PA+, PA++, किंवा PA+++ असे लिहिलेले असते. जितके '+' चे चिन्ह जास्त, तितके UVA किरणांपासून जास्त संरक्षण मिळते.
तुमची त्वचा तेलकट असल्यास जेल-बेस्ड किंवा मॅट फिनिश सनस्क्रीन निवडा. तसेच त्यावर 'Non-comedogenic' असे लिहिलेले असावे, ज्यामुळे पिंपल्स येत नाहीत.
कोरड्या त्वचेसाठी क्रीम-बेस्ड मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन उत्तम ठरते.