Indian Mango : भारतीय आंब्याची 'या' देशाला भूरळ ; आहे सर्वाधिक मागणी

Team Agrowon

आंबा हंगाम

सध्या भारतात आंब्याचा हंगाम सुरू आहे. विशिष्ट चव आणि सुगंधासाठी प्रसिध्द असणााऱ्या भारताच्या आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते.

Indian Mango | Agrowon

आंबा उत्पादन

जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आंबा उत्पादित होतो. पण तुम्हाला माहित आहे का, भारतीय आंब्याला जगातील कोणत्या देशाकडून सर्वात जास्त मागणी असते.

Indian Mango | Agrowon

आंबा आयात

संयुक्त अरब अमिराती (युएई) हा देश भारतातून सर्वाधिक आंबा आयात करतो. भारतीय आंब्याच्या खरेदीत याचा पहिला क्रमांक लागतो.

Indian Mango | Agrowon

भारतीय आंबा

डीजीसीआईएस अनुसार, युएई हा देश इतर देशांच्या तुलनेत ४४.२ टक्के आंब्याची आयात भारतातून करतो.

Indian Mango | Agrowon

आंब्याला मागणी

युएईपाठोपाठ आंबा खरेदीत दुसऱ्या क्रमांकावर युके हा देश आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण आंब्याच्या २२.४१ टक्के आंबा युके खरेदी करतो.

Indian Mango | Agrowon

प्रमुख देश

भारतातील जवळपास ९० टक्के आंबा प्रमुख आठ देश खरेदी करतात. यामध्ये युएई, युके, कतार, ओमान, कुवेत, नेपाळ, सिंगापूर आणि कॅनडा या राज्यांचा समावेश आहे.

Indian Mango | Agrowon

आंबा जाती

भारतातील लंगडा, मराठवाडा केशर, दशहरी, चौसा या आंब्याच्या जातींना परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

Indian Mango | Agrowon
Indian Mango | Agrowon