Lettuce Types : सॅलेड साठी प्रसिद्ध असलेल्या लेट्युस चे प्रकार

Team Agrowon

लेट्यूस चे प्रकार

जगभरात लेट्युसच्या निरनिराळ्या जातींच्या, प्रकारांच्या पानांचा उपयोग सॅलड म्हणून आहारात करतात. लेट्युसचे बरेच उपप्रकार आहेत. 

Lettuce Types | Agrowon

क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग लेट्युस

क्रिस्पहेड किंवा लेट्युस आइसबर्ग म्हणजेच जास्त घट्ट न झालेला कोबीसारखा गड्डा. त्याच्या पानांच्या कडा कुरतडल्यासारख्या असतात.

Lettuce Types | Agrowon

बटर हेड लेट्युस

आइसबर्गच्या खालोखाल या लेट्युसची लागवड केली जाते. या प्रकारात गड्डा तयार होतो; परंतु या गड्ड्यातील पाने जाड, मऊ असून कडा एकसारख्या असतात.

Lettuce Types | Agrowon

बीब टाइप किंवा ग्रीन्स

हा प्रकार म्हणजे बटरहेडसारख्या लेट्युसचा कोवळा गड्डा तयार होत असतानाच तो गड्डा काढला जातो. या गड्ड्यांनाच बिबटाइप लेट्युस म्हणतात. 

Lettuce Types | Agrowon

कॉस किंवा रोमेन

या प्रकारच्या लेट्युसमध्ये गड्डा तयार होत नाही. परंतू अन्य लेट्युसप्रमाणेच या प्रकारे सुरवातीची वाढ होते. सुरवातीस पाने गुलाबाच्या पाकळ्यांच्या आकारात वाढत असतात.

Lettuce Types | Agrowon

स्टेम लेट्युस

या प्रकारात जमिनीपासून उभट खोड वाढते व त्याला दाटीने पाने येतात. ग्राहकांकडून या प्रकारालाही मागणी असते.

Lettuce Types | Agrowon

लागवड

भारतात वा महाराष्ट्रात हे पीक वर्षभर घेता येते व उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. पारंपरिक लागवड पद्धतीमध्येही उच्च तंत्रज्ञान वापरून कडक उन्हाळ्याचे दोन-तीन महिने सोडल्यास वर्षभर लागवड करता येते. 

Lettuce Types | Agrowon