Anuradha Vipat
जुळी बाळे होण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आणि काही अनुवांशिक घटक असतात.
जेव्हा स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्या संयोगाने तयार झालेल्या एकाच भ्रूणाचे दोन भाग होतात आणि दोन्ही भाग स्वतंत्रपणे वाढतात, तेव्हा आयडेंटिकल ट्विन्स जन्माला येतात.
आयडेंटिकल ट्विन्स दिसायला अगदी एकसारखी असतात, त्यांचे लिंग समान असते आणि त्यांचा अनुवांशिक DNA देखील सारखा असतो.
जेव्हा स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन वेगवेगळी स्त्रीबीजे बाहेर पडतात आणि ती दोन वेगवेगळ्या पुरुषबीजांशी संयोग पावतात तेव्हा फ्रॅटर्नल ट्विन्स जन्माला येतात.
फ्रॅटर्नल ट्विन्स एकमेकांसारखी दिसूही शकतात किंवा नसूही शकतात .
फ्रॅटर्नल ट्विन्सचे लिंग वेगळे असू शकते आणि त्यांचा अनुवांशिक DNA वेगळा असतो.
जुळी बाळे होणे ही एक नैसर्गिक किंवा वैद्यकीय उपचारांमुळे घडून येणारी प्रक्रिया आहे.