Thursday Puja : गुरुवारच्या पूजेसाठी मांडणी कशी करावी?

Anuradha Vipat

पूजा

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा घरातील सुख, समृद्धी आणि शांतीसाठी केली जाते.

Thursday Puja | agrowon

श्रद्धा

मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा मांडणी विशिष्ट पद्धतीने केल्यास देवी प्रसन्न होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

Thursday Puja | agrowon

साहित्य

गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. घरातील पूजा स्थान स्वच्छ करून घ्या.सर्व पूजेचे साहित्य जमा करून ठेवा.

Thursday Puja | agrowon

मांडणी

स्वच्छ पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरा. वस्त्रावर तांदळाची रास करा. त्यावर एक तांब्याचा कलश ठेवा. कलशामध्ये थोडे पाणी, एक नाणे, सुपारी, अक्षता आणि हळद-कुंकू टाका. कलशावर आंब्याची ५ किंवा ७ पाने ठेवा पानांवर एक नारळ ठेवा .

Thursday Puja | agrowon

मूर्ती किंवा फोटो

कलशाच्या समोर महालक्ष्मीची मूर्ती ठेवा. मूर्तीला हार घाला आणि हळद-कुंकू लावा.   तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा.

Thursday Puja | agrowon

इतर साहित्य

ताम्हण आणि पूजेचे इतर साहित्य ठेवा. देवीला पिवळी फुले अर्पण करा. फळे ठेवा. घरातील तयार केलेला गोड नैवेद्य देवीच्या समोर ठेवा.

Thursday Puja | agrowon

वाचन

पूजेसाठी लागणारे 'श्री महालक्ष्मी व्रतकथा' पुस्तक पूजेदरम्यान पूर्ण भक्तिभावाने वाचन करा.

Thursday Puja | agrowon

Winter Vegetables : हिवाळ्याच्या दिवसांत 'या' भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी ठरते फायदेशीर

Winter Vegetables | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...