Turmeric : हळद संशोधन केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना होईल ?

Team Agrowon

हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी चौदा कोटी सात लाख निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील हिंगोली नांदेडसह विदर्भातील काही जिल्ह्यात हळदीचं पीक घेतलं जातं.

त्यामुळे आता या हळद संशोधन केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असं बोललं जात आहे.

या हळद केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागवड, काढणीसाठी तंत्रज्ञान निर्मिती त्यासोबतच हळदीची मूल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे.

हळद केंद्राला २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारनं मंजूरी दिली होती. 

या योजनेकरिता २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निधी वितरणाचा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार कृषी आयुक्तांना निधी देण्याची बाब विचाराधीन होती.