Animal Fodder : कडब्याची गंज कसा रचला जातो?

डॉ. सोमिनाथ घोळवे

घरच्या ज्वारीची काढणी झाली. रखरख करणारे उन असल्याने लगेच कडबा वाळून गेला. अवकाळी कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं दुष्काळात पुन्हा चारा संकट नको म्हणून

नवनाथ घोळवे

लगेच वैरणीची गंज घालून घेतली. (पहा फोटो) गावरान ज्वारीच्या कडबा म्हणजे जनावरांसाठी अतिशय कसदार आणि चवदार चारा आहे. दुभत्या जनावरांना प्राधान्याने दिला जातो.कारण अतिशय दर्जेदार-कसदार असल्याने दुधात वाढ देखील होते.

नवनाथ घोळवे

पूर्वी आजोबा सांगत होते, घरची श्रीमंत ही घरी कडब्याच्या किती गंजी आहेत आणि दावणीला जनावरे किती? यावर ठरत होती. ज्याच्याकडे दावणीला जास्त जनावरे होती, त्यांच्या मुलांना मुली देण्यासाठी सतत विचारणा होत असे.

नवनाथ घोळवे

पण आता चित्र तसे राहिले नाही. कडबा कमी मिळायला लागला आणि दावणीची जनावरे देखील कमी होऊ लागली. यांत्रिकीकरणाचे युग आले. हळूहळू पूर्व वैभव कमी होऊन यांत्रिकीकरणाचे वैभव -श्रीमंती पुढे येऊ लागली आहे. अर्थात हळूहळू ग्रामीण इलक्यातील आंनद यांत्रिकीकरणाच्या प्रेमाने हिरावून घेतला.

नवनाथ घोळवे

फोटोत दिसणारी ही गंज मोठा भाऊ नवनाथ (बापू) याने रचलेली आहे. कडब्याची गंज रचणे ही एक कला--कौशल्य आहे. कोणालाही रचता येत नाही.

नवनाथ घोळवे

तसेच गंज रचताना थोडीशी पेंडी इतके-तिकडे झाली तर गंज कलण्याची शक्यता जास्त असते. एकदा गंज रचली गेली की पुन्हा कितीही पाऊस येऊ द्या. वरचा एक थर वगळता गंजीत पाणी शिरून वैरण खराब होत नाही.

नवनाथ घोळवे