sandeep Shirguppe
जागतिक पातळीवर भारत हळद उत्पादन घेण्यास अग्रेसर आहे. हळदीचे निर्यात करणारे देशभरातून सुमारे ८ हजारांहून अधिक निर्यातदार आहेत.
भारतातून सौदी अरेबिया, युरोप, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, जपान यासह अनेक देशांत हळदीची निर्यात होते.
युरोप, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशात हळदीला चांगले दर मिळतात. त्यामुळे या देशात हळदीची निर्यात अधिक होते.
भारतातून हळदीच्या उत्पादनाच्या सरासरी १० ते १२ टक्के निर्यात होते. सन २०२०-२१ मध्ये देशातून १ लाख ८३ हजार ८६८ टन हळदीची निर्यात झाली होती.
गतवर्षी बदलत्या वातावरणाचा फटका हळदीच्या उत्पादनावर बसल्याने उत्पादनही कमी झाले होते. जागतिक बाजारपेठेत हळदीच्या दरात घसरण झाली होती.
सन २०२२-२३ मध्ये हळदीला पोषक वातावरण असल्याने हळदीचे अपेक्षित उत्पादन मिळाले, तसेच जागतिक बाजारपेठेत हळदीचे दर टिकून राहिले.
जगभरातील बाजारपेठेतून हळदीची मागणी वाढल्याने निर्यातही वाढण्यास मदत झाली. देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली.
गतवर्षीच्या तुलनेत १७ हजार ३२७ टनांनी हळद निर्यात वाढल्याची माहिती शेतीतज्ञांनी दिली.
सहा वर्षापासून भारतातून ८ ते १० टक्के निर्यात होत होती. आता मात्र १० ते १२ टक्क्यांपर्यंत हळद निर्यात पोहोचली आहे.