sandeep Shirguppe
आरोग्यासाठी मोहरीचे अनेक फायदे आहेत. केसांच्या अनेक समस्या असतील तर, मोहरीचे तेल तुम्हाला जास्त फायदा देणारं ठरेल.
मोहरी तेलात २ चमचे लिंबाचा रस घालून संपूर्ण टाळू आणि केसांवर लावल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
मोहरीच्या तेलात कोरफड घालून तुम्ही केसांना शकता. यापासून कोंडा आणि खाज निघून जाईल.
दह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते, तर मोहरीचे तेल जीवाणूनाशक असल्याने कोंडा कमी होतो.
जर तुम्ही पहिल्यांदा त्वचेवर अथवा डोक्याच्या टाळूवर मोहरीचे तेल लावत असाल तर त्यापूर्वी पॅच टेस्ट जरुर करा.
तेल लावल्यानंतर २४ तासांनी जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारची एलर्जी नसेल तर या तेलाचा वापर करू शकता.
कोरफड आणि मोहरी तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे टाळूचे संक्रमण कमी होते.