Deepak Bhandigare
मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने ती शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते
नवीन स्नायू तयार होण्यास आणि मजबुतीसाठी प्रथिनांची गरज लागते, ही गरज पूर्ण करण्यासाठी आहारात एक वाटी मसूर डाळीचा समावेश करु शकता
मसूर डाळीत फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते, पचनाची समस्या असलेल्यांनी आहारात मसूर डाळीचा समावेश केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो
मसूर डाळीमध्ये फोलेट आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते
मसूर डाळीत कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन होण्यास मदत होऊ शकते
मसूर डाळीत अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते
आहारात मसूर डाळीच्या समावेश केल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळून शरिरातील ऊर्जेची पातळी वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात
मसूर डाळीचे सेवन केल्याने रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया रोखण्यास मदत होऊ शकते