Tulsi Vastu : सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा! वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळस लावण्याची योग्य पद्धत

Anuradha Vipat

उत्तर दिशा

ही कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला तुळस लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य लाभते.

Tulsi Vastu | Agrowon

पूर्व दिशा

ही सूर्याची दिशा आहे. पूर्व दिशेला तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

Tulsi Vastu | Agrowon

ईशान्य कोपरा

उत्तर आणि पूर्व यांच्यामधील ईशान्य कोपरा हा तुळशीसाठी सर्वात उत्तम मानला जातो.

Tulsi Vastu | Agrowon

दक्षिण दिशा

घराच्या दक्षिण दिशेला विसरूनही तुळशीचे रोप लावू नये. ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते.

Tulsi Vastu | Agrowon

रोप सुकू देऊ नका

घरासमोरील तुळस कधीही सुकू देऊ नये. जर तुळस सुकली, तर ती नदीत किंवा विहिरीत विसर्जित करून त्या जागी नवीन रोप लावावे.

Tulsi Vastu | agrowon

स्वच्छता

तुळशीच्या कुंडीभोवती नेहमी स्वच्छता असावी. तेथे चपला, बूट, कचरापेटी किंवा झाडू ठेवू नका.

Tulsi Vastu | agrowon

काटेरी वनस्पती

तुळशीच्या रोपाजवळ कधीही कॅक्टस किंवा इतर काटेरी वनस्पती लावू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते.

Tulsi Vastu | agrowon

Rakhi Gifts : लग्न झालेल्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; चेहऱ्यावर येईल गोड हसू आणि होईल पैशांची बचत!

Rakhi Gifts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...