Anuradha Vipat
हिवाळ्याच्या दिवसात तुळशीच्या पानांचा काढा पिणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे थंडीतील अनेक समस्यांपासून आराम देतात.
हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका जास्त असतो. काढा पिल्याने या समस्यांपासून आराम मिळतो.
तुळशीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि झिंक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
तुळशीच्या काढ्यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. यामुळे घसा खवखवणे, दमा यापासून आराम मिळतो.
तुळशीला 'अडॅप्टोजेन' मानले जाते जे शरीराला ताणतणाव व्यवस्थापित करण्यास मदत करते.
तुळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास काढा मदत करतो.