Anuradha Vipat
हुरडा पार्टी हा एक पारंपरिक उत्सव आहे जो डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात साजरा केला जातो.
महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात हिवाळ्याच्या काळात हुरडा पार्टी खूप लोकप्रिय असते.
आज आपण या लेखात पाहूयात हुरडा पार्टी कशी करायची आणि त्यासाठी लागणारा हुरडा बनवण्याची सोपी पद्धत.
हुरडा म्हणजे ज्वारीचे कच्चे, हिरवे आणि कोवळे दाणे हे भाजून खाल्ले जातात.
हुरडा म्हणजेच ज्वारीचे कोवळे, हिरवे दाणे, मीठ, लिंबू, तिखट-मीठाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी, दही किंवा गुळवणी .
ज्वारीची ताजी, हिरवी कणसे चूलीवर सर्व बाजूंनी भाजा. भाजलेली कणसे थोडी थंड होऊ द्या. त्यानंतर कणसे चोळून त्यातील दाणे वेगळे करा.
तयार हुरडा एका भांड्यात घ्या. त्यावर चवीनुसार मीठ आणि आवश्यक असल्यास तिखट-मीठाची चटणी, लिंबू पिळून गरमागरम खा.