Mahesh Gaikwad
पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणातील बदलांमुळे आरोग्याला विविध प्रकारच्या आजारांचा धोका असतो.
या दिवसांत आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज योगासाने करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या आसानामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तसेच यामुळे छाती आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारते, ज्यामुळे श्वासोच्छवास सुधारतो.
या आसनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. नियमित अभ्यास केल्यास पोटाच्या पचनसंबंधी समस्या दूर होतात.
दररोज नियमित उत्तानासन हे आसन केल्याने शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते, ज्यामुळे हृदय आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.
भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
हे आसन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असून यामुळे झोपेच्या समस्येपासूनही सुटका होते.